सिद्धिविनायक मंदिरात एक दिवशीय चंडी याग संपन्न...

लोहोणेर (प्रतिनिधी ) : - स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात नवरात्री निमित्ताने आज एक दिवशीय सपाठ चंडीयाग मंदिर ट्रस्टचे वतीने करण्यात आला. कोरोना मुळे गेल्या दीड वर्षा पासून मंदिरे बंद होते. घटस्थापनेच्या पहील्या दिवशी मंदिरे दर्शनासाठी व धार्मिक कार्यक्रमा साठी शासनाने खुली केल्याने भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. त्यात नवरात्री ने चांगलीच भर टाकली. याचाच भाग म्हणून गेल्या दोन वर्षात इच्छा असूनही सिद्धिविनायक मंदिरात एक ही धार्मिक कार्यक्रम न झाल्याने आज नवरात्रीच्या निमित्ताने एक दिवशीय सप्तशती सपाठ चंडी याग करण्यात आला. यावेळी वे.शा. स.प्रशांत चंद्रात्रे, किशोर जोशी, लौकिक जोशी, खेमराज पाठक, हेमंत जोशी, सुधीर समुद्र आदी ब्रम्ह वृंदाच्या वेद मंत्राच्या घोष्यात हा चंडी याग संपन्न झाला. सायंकाळी महाआरतीने या चंडी यागाची सांगता करण्यात आली. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या चंडी यागासाठी सात जोडप्यानी सपत्नीक आपला सहभाग नोंदवला. सायंकाळी महाआरती नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

---------------------------------------------------

            

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad