दहिवड येथे विजेच्या धक्क्याने मेंढीचा मृत्यु, मेंढपाळ बालबाल बचावला; भरपाई मिळण्याची मेंढपाळाची मागणी

लोहोणेर (प्रतिनिधी ) : -आज ८ ऑक्टोबर रोजी देवळा तालुक्यातील दहिवड येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक मेंढपाळ बाजार तळावर आपल्या मेंढ्या चारत असताना विजेच्या खांबाला दिलेल्या तंगाच्या ताराला वीज प्रवाह उतरल्याने एक मेंढी त्याला चिटकून ठार झाली, तर मेंढीला काय झाले हे पाहायला गेलेल्या मेंढपाळाला देखील जोरात विजेचा धक्का बसला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दहिवड येथील मेंढपाळ दादाची सोनू देवरे यांच्या मालकीच्या मेंढ्या असून त्याचा महेश नामक मुलगा बाजार तळावर मेंढ्या चारत होता. अचानक पाऊस येऊन उघडून गेल्यानंतर मेंढ्या चारताना विजेच्या खांबाला दिलेल्या तंगाचा तारा जवळ गेले असता एक मेंढी चिटकून ठार झाली तर त्यांचा मुलगा महेश हा मेंढीला काय झाले आहे हे पाहायला गेला असता त्याला देखील विजेचा जोरदार शॉट लागला. मृत झालेल्या मेंढी ची माहिती वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली असून स्थानिक वायरमन शाम आहिरे व त्यांच्या साथीदारांनी लगेच वीज पुरवठा बंद करत लटकलेल्या तारा मोकळ्या करून वीजपुरवठा सुरळीत केला. मृत मेंढीची वीज वितरण कंपनीने भरपाई देण्याची मागणी मेंढपाळ दादाची देवरे यांनी केली आहे.

 -----------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :