कर आकारणी न केल्यास लोहोणेर ग्रामपंचायत ! कारखाना प्रवेशद्वाराला कुलूप लावणार !!

लोहोणेर ( प्रतिनिधी पंडित पाठक ) : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना व भाडेकरू असलेली संस्था धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर -  २  याचेकडे असलेली सुमारे ५१ लाख रुपयांची कर थकबाकी सात दिवसांत न भरल्यास कारखाना फॅक्टरी व चेअरमन केबिन ला कुलूप लावण्यात येणार असल्याची अंतिम नोटीस लोहोणेर ग्रामपंचायतीने कारखाना  व्यवस्थापनास ऐन गळीत हंगाम सुरू होण्याच्या आधी दिल्याने व्यवस्थापनाचे मात्र धाबे दणाणले आहे. याबाबत हाती आलेली माहिती अशी की, पूर्वा श्रमीचा वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा लोहोणेर ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आला आहे. कारखाना उभारणी नंतर सुमारे सन १० - ११ पर्यत सगळे व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.आकारणी पोटी मिळणारी रक्कम दर वर्षी मागणी नंतर  वेळेवर मिळत होती.मात्र काही राजकीय व्यक्ति च्या  हस्तक्षेप मुळे कारखान्या कडे आकारणी पोटी थकीत असलेली रक्कम थकत गेली. सन २०११- १२ ला कारखान्याकडे थकीत असलेली रक्कम सन २०१७ -१८ ला ३,२२,१२४/- रुपया पर्यत गेली. या रक्कमेच्या पोटी १०/२/२०१८ ला कारखान्याने सुमारे २५ हजार रुपयांचा भरणा वसाकाने केला असला तरी थकीत बाकी ही ११,९७,१२४/- रुपयांच्या घरात गेली. सन २०१८ - १९ पासून वसाकाची भाडेकरू संस्था असलेली धाराशिव कारखाना व्यवस्थापना कडे सुमारे सन २०१८-१९ पासून थेट आकारणी ११,६१,३१३ /- असे सन २०१९-२०,२०२०-२१, व २०२१ - २२ या वर्षा करिता धाराशिव कारखाना व्यवस्थापना कडे एकूण आकारणी ३८,०६,०६३ /- रुपये असून पूर्वाश्रमीच्या वसाका कारखान्याकडे सुमारे ११,९७,१२४/- रुपये असे एकूण ५१, ९५, २८०/- रुपये आकारणी पोटी थकीत असून सदर रक्कम वसुली संदर्भात लोहोणेर ग्रामपंचायतीच्यावतीने वेळोवेळी लेखी मागणी करण्यात आली आहे.यापूर्वी वारंवार लोकअदालत नोटीसा व ग्रामपंचायत मार्फत नोटीसा  देऊन सुद्धा सदर व्यवस्थापन ग्रामपंचायत थकबाकी भरली नाही. शासनाने सटाणा लोकन्यायालय मार्फत नोटीस काढूनही  सध्या भाडेकरू संस्था असलेल्या धाराशिव व्यवस्थापनाकडून या बाबत कोणताही गांभीर्याने विचार केला जात नसल्याने लोहोणेर ग्रामपंचायतीने सदर थकबाकी भरावी म्हणून सात दिवसांची मुद्दत असलेली अंतिम  नोटीस दि.१४ ऑक्टोबर रोजी कारखाना व्यवस्थापनास बजावली आहे. येत्या २१ ऑक्टोबर पर्यत सदर थकबाकी जमा न केल्यास कारखानाच्या  मुख्य फॅक्टरी गेटला व चेअरमन केबिनच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्याचा इशारा लोहोणेर ग्रामपंचायतीने या अंतिम नोटीस द्वारे कारखाना व्यवस्थापनास  दिला आहे. सद्या कारखाना व्यवस्थापना कडून सन २०२१ -२२ च्या गळीत हंगामा सुरू करण्याचे नियोजन सुरू असून या  नियोजना पूर्वीच लोहोणेर ग्रामपंचायती कडून थकीत आकारणी पोटी अंतिम नोटीस मिळाल्याने आगामी गळीत हंगामात व्हिन्न उभे राहू नये म्हणून धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे. 

वसाका कारखाना हा लोहोणेर ग्रामपंचायत हद्दीत असून कारखान्याकडे थकीत असलेल्या आकारणी पोटी रक्कम वसूल करण्यासाठी वेळोवेळी नोटिसा देऊन वसुली संदर्भात धाराशिव व्यवस्थापनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून अंतिम नोटीस बजावली आहे. या कार्यवाहीसाठी ग्रामपंचायत बांधील आहे.
यु.बी.खैरनार ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत लोहोणेर 

कारखाना व्यवस्थापनाकडे ५१,९५,२८०/- रुपये आकारणी पोटी थकीत असून या संदर्भात वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. सदर रक्कम वसुली साठी अंतिम नोटीस बजावली असून मुदतीत रक्कम न मिळाल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने कारखाना गेट व चेअरमन केबिनला आम्ही कुलूप लावण्यास बांधील आहोत.
सौ.पूनम पवार सरपंच ग्रामपंचायत लोहोणेर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad