ज्या ठिकाणी १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर तिथे १४ दिवसांचा कडक लॉकडाउन : राज्यांना केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना

                                       

Subscribe & Follow 

देशातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने राज्यांना नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना पत्र लिहिलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं राज्यांनी पालन करावं, असं गृह सचिवांनी म्हटलं आहे.


करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थिती बिघडत चालली आहे. राज्य सरकारांनी निर्बंधांचे कडक पालन करून नागरिकांवर सक्ती केली पाहिजे. ज्या भागांमध्ये करोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा एका आठवड्यापासून १० टक्क्यांहून अधिक आहे आणि हॉस्पिटल्समधील बेड हे ६० टक्क्यांहून अधिक भरलेले असतील तर त्या भागांमध्ये १४ दिवसांचा कडक लॉकडाउन घोषित करावा,  तसेच जिल्ह्यांमध्ये छोटे-छोटे कंटेन्मेंट झोन बनवण्यास सांगितलं आहे. मोठ-मोठे कंटेन्मेंट झोन बनवण्यापासून दूर राहिलं पाहिजे. गरज पडल्यास पूर्ण पडताळणीनंतरच हे पाउल उचललं गेलं पाहिजे. किती नागरिकांना संसर्ग झाला आहे आणि किती भाग बंद केला पाहिजे, हे आधी निश्चित करावं. लॉकडाउन लावण्यापूर्वी एक नियमावली तयार करा. यामुळे लॉकडाउनचा उद्देश पूर्ण होण्यास मदत होईल, असं केंद्राने राज्यांना सांगितलं आहे.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे...

✅ संचारबंदीचा कालावधी निश्चित करण्याची सूट स्थानिक प्रशासनाला द्यावी. रात्रीच्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करावी

 सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शिक्षण, सांस्कृतिक, धार्मिक आणि उत्सवांसारख्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालावी

✅ ट्रेन, मेट्रो, बस आणि कॅब निम्म्या क्षमतेने चालवण्यास सूट देता येईल

✅ आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर बंदी घालून नये. आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अजिबात अडवू नका

 नागरिकांच्या भेटी-गाठी रोखल्यानेच करोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबवला जाऊ शकतो

 लग्न सोहळ्यांमध्ये ५० आणि अंत्यसंस्कारावेळी २० नागरिकांना परवानगी द्यावी

✅ निम्म्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालय उघडण्यास सूट देता येईल.

कारखाने आणि संशोधनासंबंधीत संस्थांना सूट द्या, पण तिथे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन झाले पाहिजे. वेळोवेळी कर्मचाऱ्यांची रॅपिड-अँटिजेन चाचणी झाली पाहिजे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :