विठेवाडी : डॉ. आहेर आश्रम शाळा येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांतीदिन साजरा


"विठेवाडी येथे नागरिकांचा लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद अवघ्या तीन तासात 110 लसीकरण केले पूर्ण."
लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - देवळा तालुक्यातील दौलतराव आहेर अनुदानित आदिवासी आश्रम शाळा विठेवाडी येथे प्रथमता बिरसा मुंडा यांची प्रतीमा पुजन विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी सुनील निकम, यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कोरोना लसीकरण करण्यात आले. यावेळी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जे. एस. सूर्यवंशी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी. बी. देवरे, खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ आडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहायक संजय कुंभार्डे, विठेवाडी येथील आरोग्य सेवक संजय भामरे, भऊर आरोग्य सेवक येथील संतोष शेरे, सावकी येथील आरोग्य सेवक दादा शेवाळे, विठेवाडी येथील उपकेंद्राच्या आरोग्य सेविका तनुजा बोरसे, अधीक्षक प्रशांत पवार आदी उपस्थित होते. लसीकरण शिबिराला उस्फूर्त नागरिकांनी प्रतिसाद दिला. जागतिक आदिवासी दिन म्हणून लसीकरण मोहीम राबवली गेली. यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, अधीक्षक, अधीक्षिका कर्मचारी व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्ग आधीच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भगवान आहेर यांनी केले.




बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :