डॉ.नुतन आहेर यांना मिळालेली डॉक्टरेट पदवी खरया कार्य कार्यकर्तुत्वाला न्याय: ॲड. रवींद्र पगार.

देवळात-वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर यांनी महिला समुपोदेशन केंद्राच्या माध्यमाने अनेक विस्कटलेल्या कुटुंबाची घडी बसवून शेकडो महिलांना न्याय मिळवून देत खऱ्या अर्थाने समाजकार्य केल्याने त्यांना नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार व मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याने खऱ्या कार्यकर्तृत्वाला न्याय मिळाला. त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार यांनी देवळा येथे अध्यक्षीय भाषणात केले.
येथील वत्सला लॉन्स येथे नूतन आहेर यांना अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस अंड डेवलपमेंट च्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यानिमित्ताने सर्वपक्षीय सत्कार समितीच्या वतीने सौ नुतन आहेर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ॲड. पगार म्हणाले की श्री. सुनील आहेर व सौ नुतन आहेर यांचे सामाजिक कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. परिसरातील रस्ते, पाणी, विज पक्षसंघटन व बळकटीकरण यासाठी अथक प्रयत्न केले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवर बागलान चे माजी आमदार संजय चव्हाण, मविप्र चे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे रा. काँ. प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील, तालुका रा.काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ, टेंभे येथील सरपंच भाऊसाहेब आहिरे, प्रभाकर पाटील ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आहेर ,जिल्हा परिषद सदस्या नुतन आहेर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर खरोटे यांनी सूत्रसंचालन प्रा. गोरख निकम तर आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप आहेर यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,जि.प.सदस्य महेंद्र काळे, समता परिषदेचे रमेश अहिरे, योगेश पवार, बापू आहेर, माणिक शिंदे, दीपक देशमुख ,धनंजय बोरसे, मनोज देशमुख,सनी आहेर, निंबा निकम ,महेंद्र देवरे, रिंकू जाधव ,दशरथ पुरकर ,गंगाधर मामा शिरसाठ,सचिनराजे देवरे, प्रदीप सोनवणे आदि कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ हितचिंतक उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :