लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - लोहोणेर व परिसरात जनावरांच्या लंमपी या त्वचारोगाने थैमान घातले आहे. यामुळे पशुपालक शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर लोहोणेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ल ग्रामपंचायतीच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर व पंचायत समितीच्या सदस्य सौ.कल्पना देशमुख व सरपंच सौ. पूनम पवार यांच्या हस्ते मोफत औषधे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी पशुधन तपासणी करुन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांना केले. जनावरांना उदभवलेल्या या लम्पि आजाराने जिल्ह्यात सर्वत्र थैमान घातल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या आदेशानुसार ज्या ग्रामपंचायतीच्या परिसरात लंम्पी त्वचारोग हा विषाणूजन्य आजार आढळून आल्यास त्या ग्रामपंचायतीने ग्रामनिधी मधून मोफत औषधोपचारासाठी पंधरा हजार रुपये खर्चाची विशेष तरतूद करण्यात यावी असे आदेश दिले होते.या अनुषंगानेच लोहोणेर ग्रामपंचायतीने तातडीने निधी उपलब्ध करून दिली होता. लसीकरण वाटपाचे वेळी प्रमुख पाहुणे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी ही शेतकऱ्यांना पशुधन तपासणी करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. तसेच यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष निधीतून स्थानिक नागरिकांसाठी लोहोणेर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कोरोना एंटीजन टेस्ट करण्यासाठी सुमारे एक हजार किट बॉक्स वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्यां कल्पनाताई देशमुख, सरपंच पुनम पवार, गोटीराम शेवाळे,ग्रामविकास अधिकारी यु बी खैरनार, ग्रामपंचायतीचे सदस्य सतिष सोमवंशी, रतिलाल परदेशी, धोंडु आहीरे, निंबा धामणे, दिलीप भालेराव, उषाबाई सोनवणे, प्रतिभा सोनवणे, संजय सोनवणे ,राकेश गुळेचा,संजय भदाणे, डॉ.सजंय महाजन, आबासाहेब देशमुख ,योगेश पवार, रमेश आहिरे, संजय भदाणे, गणेश शेवाळे, रमेश सोनवणे, प्रार्थमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोहोणेर ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन पंडित पाठक यांनी केले.
---------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig
