अखेर अभिनेता फरहान अख्तर ट्रोल : सोशल मीडियातून संताप व्यक्त

 


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने यांनी बनवलेली कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लशीची खुल्या बाजारातील किंमत इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त असल्याची चर्चा सुरू आहे. सीरमने जाहीर केल्यानुसार राज्यांच्या सरकारी रुग्णालयांसाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांना १५० रुपयांत लशीचे डोस देण्यात येणार आहेत.  त्याला प्रतिउत्तर देतांना अभिनेता फरहान अख्तरने प्रश्न उपस्थित केला होता. 'कोव्हिशिल्ड ही लस केंद्राला ज्या किंमतीत मिळतेय, त्याच किंमतीत सर्व  राज्याला का नाही मिळू शकत,  सीरम इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी यांचे स्पष्टीकरण देऊ शकणार का ?   



अभिनेता फरहान अख्तरने केलेले ट्विट : 

जर काही कारणांमुळे त्यांनी ही किंमत ठरवली असेल तर ती कारणं सांगा', असं ट्विट फरहानने केलं होतं.

परंतु यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानंतर मात्र सोशल मीडियावर फरहानला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. 





फरहान अख्तरला  ट्रोल करताना नेटकरी म्हणतात : 

व्हॅक्सिन आणि व्हायरस यांबद्दल सखोल माहिती नसतानाही लशींच्या किंमतीबद्दल प्रश्न विचारणारा फरहान मूर्ख आहे, तसेच तुम्ही चित्रपट किती बजेटमध्ये बनवता आणि प्रेक्षकाकडून तिकिटाची किती रक्कम घेतात. असा सवाल नेटकऱ्यांनी फरहानला केला आहे. असं काहींनी म्हटलंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :