लोहोणेर गावात एक महिन्याच्या अंतराने कोविड १९ चा रुग्ण आढळळा.

लोहोणेर (प्रतिनिधी ) : - लोहोणेर गावात तब्बल एक महिन्याच्या अंतराने कोविड १९ ची लागण झालेला रुग्ण आढळून आल्याने लोहोणेर गावांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात लोहोणेर येथे कोविड१९ ची लागण झालेली महिला रुग्ण आढळून आली होती. त्यानंतर लोहोणेर येथील कोविड रुग्ण संख्या ही शून्य होती मात्र आज तालुका वैधकीय अधिकारी यांच्या अहवालात लोहोणेर येथील एक ४७ वर्षीय इसमाला कोविड १९ लागण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.सदर रुग्ण बाहेर गावी वास्तव्यास असला तरी सध्या तो लोहोणेर येथे असल्याने लोहोणेरकराच्या चिंतेत भर पडली आहे. तब्बल पंचवीस दिवसांच्या अंतराने लोहोणेर गावांत कोरोना बाधित रुग्ण आढळून आला असून सदर रुग्ण हा होम कॉर्नटायईन करण्यात आला आहे. लोहोणेर गावात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने स्थानिक प्रशासनाने मात्र धसका घेतला असून लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने खबरदारी साठी योग्य ती उपाय योजना हाती घेण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :