ठेंगोडा येथील सिद्धिविनायक मंदिरात ५१ अथर्वशीर्ष आवर्तन कार्यक्रम...

लोहोणेर (प्रतिनिधी ) : - ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात एकादशीच्या निमित्ताने सटाणा येथील महालक्ष्मी ग्रूप, मंगळागौरी ग्रुप, ईनर व्हील क्लब सटाणा, यांच्यावतीने ५१ अर्थवश्रीर्षं आवर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सटाणा शहरातील सुमारे सत्तर महिलांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. अंत्यत सुंदर व मधुर आवाजात सर्व महिलांनी गणपतीची ५१ आवर्तने पूर्ण केली.यावेळी वैशाली जोशी, रुपाली कोठावदे, शुभांगी चंद्रात्रे, सरोज चंद्रात्रे, रुपाली जाधव, संध्या चंद्रात्रे, डॉ. शुभदा माजगावकर, शर्मिला कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, विद्या सोनवणे, स्मिता शहा, आदी महिलांनी पुढाकार घेऊन सदर कार्यक्रम आयोजित केला होता. आर्थवशीर्ष आवर्तने पार पडल्यानंतर महिलांनी भजने सादर केली. यावेळी महाआरती नंतर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने सदर महिलांना व दर्शनार्थीना चहा, साबुदाणा खिचडी व केळीचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :