लोहोणेर येथे रमाई आवास घरकुलांची पाहणी

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - विभागीय अंमलबजावणी सनियंत्रण व मूल्यमापन समितीचे त्रीसदस्यनी आज लोहोणेर येथे भेट देऊन रमाई आवास घरकुल योजनेत बांधकाम केलेल्या दुमजली घरांची पाहणी करत समाधान व्यक्त केले. बी.एन. पानसरे ( कार्यकारी अभियंता राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण बेलापूर -नवी मुंबई ), आर.एन.लंबोधरी ( सहाय्यक कार्यक्रम अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक ), श्री सिद्दीकी (विभागीय प्रोग्रामर, आयुक्त कार्यालय नाशिक ) यांचा या विभागीय अंमलबजावणी सनियंत्रण व मूल्यमापन समितीच्या सदस्य म्हणून सहभाग होता. लोहोणेर ग्रामपंचायतीचेवतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. रमाई आवास योजने अंतर्गत लाभार्थीनी केलेल्या दुमजली घरकुल बांधकाम या समितीने पाहणी केली व काही योग्य त्या सूचना करीत समाधान व्यक्त केले. यावेळी एस.जी.पगार ( देवळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ), पी.के.ठाकरे ( सहाय्यक स्थापत्य अधिकारी पंचायत समिती देवळा ), ललित जाधव ( तालुका घरकुल डाटा ऑपरेटर प.स.देवळा ) यांचे यु. बी.खैरनार ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी ), योगेश पवार, धोंडू आहिरे, संजय सोनवणे, आदी यावेळी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :