देवळा तालुक्यात आरोग्य विभागाचे वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस गती देण्यात आली असून तालुक्यातील तीन गावांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले असून इतर अनेक गावे अंतिम टप्प्यात आहेत. असे असले तरी लसीकरणास नकार देणाऱ्यांची संख्या ७३२ इतकी तर १ हजार १८ इतके नागरिक स्थलांतरीत असल्याने लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास अडथळे येत आहेत. ३५ हजार ३१८ नागरिकांचा पहिला डोस अद्याप शिल्लक असल्याने आरोग्य विभाग मिशन कवच कुंडल व युवा स्वाथ्य मिशन अंतर्गत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. व्यापक प्रमाणात कोरोना लसीकरण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याने देवळा तालुक्यातील लहान मोठ्या वाडी-वस्ती, आठवडे बाजारात, आदिवासी वस्तींत, दुर्गम डोंगर-खोऱ्यात घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. मात्र काही जाणीवपूर्वक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना टाळत आहेत तर काही जण शेजारी लसीकरण होत असताना कमी पणा म्हणून लस न घेता इतरत्र पसार होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. तर मजूर वर्ग दिवसा कामावर निघून जात असल्याने आरोग्य कर्मचारी रात्रीच्या वेळी थेट घरी जात कोरोना प्रतिबंधक लसी टोचत आहेत. यामुळे यामुळे आरोग्य विभागाचे वतीने तालुक्यातील खामखेडा, खर्डे, भावडे या तीनही गावांत शंभर टक्के लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेणारे १ लाख २३ हजार २४४ इतके लाभार्थी असून त्यापैकी ८७ हजार ९२६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. १८ वर्षापुढील ३५ हजार ३१८ लाभार्थ्यांचा पहिला डोस बाकी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत आजपासून महाविद्यालयांमध्ये लसीकरण केले जात आहे. दररोज जवळपास २७ ठिकाणी लसीकरण राबवले जात आहे. अशी माहिती देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पाटील यांनी दिली. यापूर्वी नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत भांडायचे परंतु आता मात्र उलट चित्र पहावयास मिळत आहे. आरोग्य कर्मचारी स्वतः प्रत्येक ठिकाणी जात लस घेण्याचा आग्रह धरत आहेत. त्यासाठी जनजागृती केली जात आहे. तरीही काही जण लसीकरण करून घेण्यास नकार देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
---------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig