विठेवाडी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळा! नामवंत कीर्तनकार करणार आपली सेवा रुजू !

लोहोणेर (प्रतिनिधी ) : -  देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील हनुमान मंदिरात गेल्या वीस वर्षा पासून सुरू असलेल्या दि.२६ ऑक्टोबर पासून ते २ नोव्हेंबर पर्यत  ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण  व अखंड संकीर्तन सप्ताहास प्रारंभ होत असून या सप्ताहाच्या निमित्ताने ह.भ.प. सौ.इंद्रायणी ताई मोरे ( पाथड्रे मालेगाव ),चेतन महाराज (मालेगाव), माधव महाराज (विठेवाडी), शशिकांत महाराज ( करजगव्हाण ),बालाजी महाराज मोहिते ( बीड), वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा ( जेऊर ), शिवचरित्रकार गुरुदेव महाराज (कोपरगाव), संजय नाना धोंडगे (मकरंद वाडी ) आदी नामवंत कीर्तनकार आपली सेवा रुजू करीत आहेत.या सप्ताहाच्या निमित्ताने पहाटे काकडा आरती, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन, हरिपाठ व गीतापाठ, व रात्री कीर्तन सोहळा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे माजी अध्यक्ष ह. भ. प. संजय नाना धोंडगे यांच्या काल्याच्या किर्तना नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या नंतर या सप्ताहाची सांगता होणार आहे. या धार्मिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी व वारकरी संप्रदायाचे सेवेकरीनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विठेवाडी ग्रामस्थ व आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad