देवळा : गुंजाळ नगर येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..

देवळा तालुक्यातील गुंजाळ नगर येथील रहिवाशी असलेले मंगेश सुखदेव आहेर यांचा मोठा मुलगा पियुष मंगेश आहेर( वय २१)याने शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या माडीवर गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याची आई घरकाम करीत होती पियुष विद्युत .रोषणाईसाठी लाइटिंग भाड्याने देण्याचा व्यवसाय करीत होता. त्याच्याकडे कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी पियुष ला फोन केला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घरात त्याच्या आईकडे विचारलेअसता आईने त्यांना पियुष माडीवर असल्याचे सांगितल्यावर कर्मचारी माडीवर गेले असता पियुष ने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.त्याचे काका योगेश आहेर यांनी देवळा पोलिसांना घटनेची खबर दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामाकेला. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .त्याचे पश्चात आई ,वडील ,भाऊ ,बहिण असा परिवार आहे देवळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. देवळा तालुक्यात लोहोणेर व गुंजाळ नगर अशा दोन युवकांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


-----------------------------------------------------




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :