कळवण ( प्रतिनिधी ) : - कळवण तालुक्यातील विसापुर येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनी मुख्याध्यापकांनी शिक्षण सेतू अभियानाचे काम सांगितल्याचा कारणावरून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मुख्याध्यापकांना मारहाण केल्याच्या आरोपावरून एकात्मिक आदिवासी विकासाचे प्रकल्पधिकारी तथा सह्याक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी देसले यांचे निलंबन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा विसापूर येथील मुख्याध्यापक रवींद्र मानकर यांनी सदर तक्रार प्रकल्पधिकारी विकास मीना यांचे कडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती.
या तक्रारीत देसले कामात टाळाटाळ करीत असल्याचे त्यांना हे काम करण्यास सांगितले असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरुन हे काम माझे नसून मी ते करणार नाही. असे सांगून मी शाळेत शासकीय कामकाज करीत असतांना त्यांनी मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig