लोहोणेर - कळवण रस्त्यावर मोटरसायकल व पिकअप गाडी मध्ये अपघात

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - लोहोणेर - कळवण रस्त्यावर शिवनाल्याच्या जवळ आज सायंकाळी मोटरसायकल व पिकअप गाडी मध्ये अपघात झाल्याने मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्यास तातडीने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर जागेवर दर महिन्याला लहान - मोठे अपघात घडत असल्याने याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी भऊर ग्रामस्थ व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आघार येथून कळवण कडे जात असलेली दूध वाहतूक करणारी पिकअप (एम.एच. ४१ जी.०२८२ ) या गाडीने शिव नाला ओलांडून पुढे नेपाळी चौफुली कडे जात असताना कळवण कडून खालप ( ता.कळवण ) कडे जात असलेली बजाज प्लॅटिना मोटार सायकल ( एम.एच.४१ बी. बी. ८०६९ ) ला धडक दिल्याने मोटर सायकल स्वार हेमंत भाऊदास जाधव ( वय ३२ ) रा.खालप याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत. सदर जागेवर नियमित लहान - मोठे अपघात घडत असल्याने याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी भऊर ग्रामपंचायतीचे सरपंच दादा मोरे, पोलीस पाटील भरत पवार, सुभाष पवार, प्रभाकर पवार, शैलेश पवार, दीपक पवार, दिनेश पवार, डॉ. भाऊसाहेब पवार, दिलीप पवार आदींनी केली आहे.






बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :