आकाश सायकर
भारत महासता होईल का ?
१९४७ साली
स्वातंत्र्य मिलालेला भारत आज प्रगतीच्या दिशेने वेगाने आपली भक्कम पावले टाकत
आहे. आणि हि सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. कुणीतरी मी ऐकलेल्या एका
भाषणात असे एकले होते की डॉ.कलमांच्या स्वप्नातील भारत हा २०२० साली महासत्ता
म्हणून उदयास येईल. काय माहित पण मला हे त्याने बोलेले वाक्य एकदम जवळून लागून
गेले. खरच! अस होईल का ? आज आपण पाहिलं तर भारताकडे सर्व देश जगातील प्रमुख
बाजारपेठ म्हणून पाहतात. मात्र भारतात दर दोन दिवसांनी कानावर येणारा भ्रष्टचार,
बेरोजगारी, गुन्हेगारी, जातीय दंगली, इत्यादी सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांनी वसा
घातलेला दिसतो मात्र आपण या सर्व गोष्टी कोणत्या दृष्टीकोनातून पहातो हे ही
महत्वाचे आहे. २०१७ -१८ या साली भारतावर भ्रष्टचारा सारखा एक खूप मोठा शत्रू आक्रमण कारण
गेला सर्वांच्या डोळ्यासमोरची ताजी उदाहरण म्हणजेच (विजय मल्या, निरव मोदी)
त्याचबरोबर जातीय दंगली भीमा कोरेगावच्या या दंगलीत कोटींचे नुकसान झाले. या
जबाबदार कोण माफ करा पण मला कोणाच्या जाती बद्दल बोलण्याचा अधिकार नाही. या
सगळ्यांमध्ये शेतकरी मात्र फाशी घेऊन मारतो. त्याच्या नशिबी मात्र नेहमीच कमी दम
आणि कर्जाचे बोजे एकेकडे सरकारही त्याला विसरते आणि दुसरीकडे त्याच्या शेतमालाला
दाम नाही. भारत आणि पाकिस्तान मध्ये वारंवार होणारे भांडण तुम्हाला वाटत तुम्ही
खरच डॉ. कलामांचे स्वप्न सत्यात आणू शकता विचार करण्यासारखी बाब आहे.