लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - देवळा - सटाणा शहरानाचं नव्हे तर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तसेच साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गा वरील लोहोणेर - ठेंगोडा गावालगत वाहत असलेल्या गिरणा नदीवरील ब्रिटिश सरकारने बांधलेल्या ब्रिटिश कालीन जुन्या गिरणा पुलावर पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने सदर पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने पादचारी वर्गास चांगलाच त्रास सहन करावा लागत असून सुसाट वेगाने जाणारे दुचाकी स्वार व चार चाकी वाहन चालक आपल्या वाहनाच्या वेगाला आळा न घालता सुसाट वेगाने जात असल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. लोहोणेर ठेंगोडा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस रात्री बेरात्री आपली हजेरी लावत आहे. या पावसाचे पाणी ब्रिटिश कालीन पुलावर मोठ्या प्रमाणावर साचलेले पाणी निचरा होण्यासाठी योग्य सोय नसल्याने साचत असलेल्या पाण्याचे ठिकठिकाणी मोठमोठे तळे साचत असते.यामुळे या पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दुचाकी अथवा चार चाकी वाहन आपल्या वेगाला आवर न घालता सुसाट वेगाने जात असल्याने या पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्याचे सर्वच कपडे खराब होत असतात पर्यायाने त्यास मानसिक त्रास विनाकारण सहन करावा लागतो. सदर पुलावर ठीक ठिकाणी खड्डे ही पडले असून पावसाच्या पाण्याने सदर खड्डे भरल्या खड्ड्या चा अंदाज येत नसल्याने सदर पुलावर लहान - मोठे अपघात घडत असतात त्यामुळे सदर पुलावरील पाण्याचा निचरा होणारी सोय करावी व सदर पुलावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी लोहोणेर - ठेंगोडा येथील ग्रामस्थ व वाहन -चालक मालकाचे वतीने करण्यात येत आहे.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
9765227710 / 7875281316