चला मुलांनो शाळेत चला" उपक्रमांतर्गत लोहोणेर जनता विद्यालयाच्या इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांची शाळेला हजेरी !
0Pandit PathakOctober 04, 2021
लोहोणेर (प्रतिनिधी ) : - येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात "चला मुलांनो शाळेत चला" या उपक्रमांतर्गत इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेला पहिल्याच दिवशी मोठया उत्साहात हजेरी लावली. शासनाच्या आदेशानुसार दिनांक ४ऑक्टोबर पासून इयत्ता ५वी ते ७वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याला परवानगी देण्यात आली. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शालेय परिसराची स्वच्छता करून परिसर व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉशची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करताच त्यांचे तापमान घेण्यात आले.यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक उपक्रमांतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी ,पर्यवेक्षक बी. के. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंद दिसत होता.यावेळी विद्यालयाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले होते.याप्रसंगी देवळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रतिनिधी शरद साळुंखे यांनी शाळेला भेट देत एकूण शाळेच्या नियोजनाची पाहणी केली.