देवळा तालुक्यातील सावकी गावात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर मका पीक भुईसपाट झाले. अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडाले असून मोठ मोठी झाडे कोसळली. वीज वितरण कंपनीचे विद्युत पोल पडल्याने वीजपुरवठा खंडीत होत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे तासभर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांचे नुकसान झाले. मका भुईसपाट तर काढणीसाठी आलेला सोयाबीन,तुर पिकाचे नुकसान झाले. स्थानिक शेतकरी दादाजी बारकू अहिरे यांच्या घराजवळील आंबा व जिजाबाई दिलीप चव्हाण गट नं.2019 मधील घराजवळील मोठे झाड कांदाचाळी वर व शेडवर पडल्याने या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी गुरुवारी आमदार डॉ.राहुल आहेर व भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर, संजय धोंडगे तहसीलदार विजय सूर्यवंशी, नायब तहसीलदार विजय बनसोडे ,कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी गावातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. तलाठी कल्याणी कोळी ,ग्रामसेवक वैशाली पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी धनंजय बोरसे, कारभारी पवार, अरुण शिवले, दिलीप पाटील आदि ग्रामस्थांनी केली.
---------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig
