महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा च्या संपर्क प्रमुखपदी ह.भ.प.कृष्णा (तात्या) रौदंळ यांची निवड करण्यात आली समाजात व्यसनमुक्ती चे प्रचारक म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. आणि याच कार्याची दखल घेत राज्याचे कार्यध्यक्ष ह.भ.प रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन कार्याचा गौरव करण्यात आला.
समाजात तरुण आज मोठ्या प्रमाणात तबांकु, सिगारेट, गुटखा, दारूआदींच्या सेवनाने आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहे. अनेकांचे संसार ह्या व्यसनामुळे उध्वस्त झालेले दिसत आहे. म्हणून अशा तरुणाईला व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांत जाउन मोफत समाज प्रबोधन करणारे व सटाणा तालुक्यातील दुर्गम भागातील तळवाडे दिगर गावातील कृष्णा तात्या हे रहीवासी आहेत. यावेळी ह.भ.प रामकृष्ण महाराज लहवीतकर, महामंडलेश्वर देवबाप्पा (फरशीवाले) राज्यध्यक्ष ह.भ.प.आर के रांजणे, जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.श्रावण महाराज आहीरे कुकाणेकर, राज्याचे सचिव ह.भ.रेवाजी बालाजी वाळुंज ह.भ.प प्रभाकर महाराज फुलसुदंर, जिल्हा सचिव ह.भ.प.लहु महाराज आहीरे यांच्या उपस्थितीत ओझर येथील समारंभात नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बोलताना ह.भ.प रामकृष्ण महाराज लहवीतकर म्हणाले की खरया अर्थाने समाजात व्यसनमुक्ती सारखे समाजकार्य मोफत करून समाजातील शेकडो तरुणांना चांगल्या मार्गाला लावणार्या कृष्णातात्या रौदंळ यांची सटाणा तालुक्यातुन सार्थ निवड झाली आहे. या नियुक्ती चे आमदार दिलीप बोरसे, द्वारकाधीश कारखान्याचे संस्थापक शंकरराव सावंत, नामपुर बाजार समितीचे संचालक कृष्णा भामरे, सटाणा बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांनी स्वागत केले.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/DrMh1FvmNNu66MyowfFXov
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig