लोहोणेर येथे मा. केदा आहेर यांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन



लोहोणेर (विशेष प्रतिनिधी) देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. केदा नाना आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमीपुजन करण्यात आले. यात प्रामुख्याने माळीवाडा परिसर काॅक्रीटीकरण, कमलादेवी मंदीर, शुशोभिकरण व काॅक्रीटीकरण, कोळी वाडा कानिफनाथ मंदीर परिसर काॅक्रीटीकरण तसेच ग्रामपंचायत परिसर शुशोभिकरण व वृक्षारोपण, बाजार पट्टीतील स्वच्छालय बांधणे व गाळे बांधणे अशी विविध उद्घाटन एकाच दिवशी करण्यात आली. यावेळी मा. केदा नाना आहेर यांनी बोलताना सांगितले की लोहोणेर च्या विकासाठी कटीबध्द असुन आगामी काळात ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गावाच्या विकास कामांचा आराखडा/सुची तयार करुन गावातील प्रलंबित कामे मार्गी लावावीत. या कामी कोणतीही मदत लागल्यास मी कटीबध्द असुन तुम्ही हाक द्या मी साथ देईन असे आपल्या मनोगतात स्पष्ट केले. या सर्व कामांच्या माध्यमातून गावाच्या सौंदर्यात व विकासात भर पडणार असून नागरिकांत समाधान व्यक्त केले जात.
     यात गावाच्या वतीने प्रसाद देशमुख व पंडित (नाना) पाठक यांनी आभार व्यक्त करतांना सांगितले की, विकासात लोहोणेर गाव आपल्या पाठिशी पुर्ण पाठीशी असुन गावाच्या विकासासाठी कुठलीही अडचण येणार नाही.
           यावेळी भुमीपुजन व उद्घाटनप्रसंगी सरपंच पुनमताई पवार,रमेश अण्णा अहिरे, जितेंद्र आहेर, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, योगेश आबा पवार ग्रामपंचायत सदस्य रतिलाल भाऊ परदेशी, अनिल बापु आहेर, धोंडुअण्णा आहीरे, निंबा धामणे, चंद्रकांत शेवाळे शेवाळे, संजय सोनवणे, अविनाश दादा महाजन, सोपान सोनवणे, समाधान महाजन, जाकिर शेख, संजय परदेशी, राकेश कोठावदे, गणेश अली, कैलास शेवाळे, सागर भालेराव,दिलीप जाधव, जगन बच्छाव ग्रामसेवक यु बी खैरनार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316

कसमादे मराठी न्यूज  👇


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :