शिवसेनेच्या वतीने भउर येथील आशा सेविकांचे कौतुक व सत्कार

Top Post Ad

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे समन्वयक मिर्लेकर, संपर्क मंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा ग्रामीण प्रमुख सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने भऊर येथील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या उपकेंद्रात आशा सेविकांचा ड्रेस कोड (साड्या) देवुन सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले. कोरोना काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता घरोघर जाऊन प्रत्येक नागरिकांची करोना प्राथमिक तपासणी करून जिवावर उदार होऊन जे काम आशा सेविकांनी केले. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भऊर येथील उपकेंद्रातील आशा सेविकांना शिवसेना देवळा तालुका प्रमुख सुनिल पवार यांनी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून गणवेश साडी वाटप केली. या कार्यक्रमावेळी गण प्रमुख भास्कर पवार व शाखा प्रमुख आबा बोरसे उपस्थित होते.


बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316

कसमादे मराठी न्यूज  👇


 


Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.