लोहोणेर (प्रतिनिधी ) : - शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने देवळा तालुक्यातील देवळा, खर्ड, भऊर उमराणे, लोहोणेर आदी गावात हे अभियान राबविण्यात येत आहे. आणि यात देवळा तालुक्यातील महीला संघटन व पक्ष वाढविण्यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे. संपूर्ण देवळा तालुक्यात शिवसेना महिला आघाडीच्या गाव तेथे शाखा स्थापन करण्याचा दृष्टीने महिलांना बरोबर घेऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी आपण कटीबध्द व प्रयत्नशील असल्याची माहिती पिंपळगाव वाखारी येथील शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी ज्योतीताई थोरात यांनी दिली. देवळा तालुक्यात शिवसंपर्क अभियान दौरा पार पडला. या अभियानात येथील ज्योती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल थोरात, पंकज सोनवणे, जितेंद्र थोरात, अनिकेत जाधव, रवींद्र सोनवणे, योगेश आहिरे, मनोज बच्छाव, मोहीनी थोरात, शीतल जाधव, सुनंदा सोनवणे, माया सोनवणे आदींनी शिवबंधन बांधुन पक्षात आपला प्रवास केला. यावेळी तालुकाप्रमुख सुनिल पवार, गटप्रमुख सुनिल शिरसाठ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/DrMh1FvmNNu66MyowfFXov
जाहिराती व बातमी साठी संपर्क
9765227710 / 7875281316