सेवा पूर्ती निमित्ताने लता जाधव यांचा सत्कार

Top Post Ad

लोहोणेर (प्रतिनिधी ) : - लोहोणेर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ. लता बाळासाहेब बच्छाव (जाधव ) याचा सेवापूर्ती चा कार्यक्रम झाला. सौ. लता बच्छाव हया ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवा निवृत्त होत आहेत. त्यांनी मोकभणगी, चांदोरी, करंजाड, ठेंगोडा, कळवण, लोहोणेर आदी गावांतील शाळा मध्ये त्यांनी आपली सेवा केली. 
 त्यांचा सेवा पूर्ती निमित्ताने सत्काराचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहोणेर येथे देवळा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सतीश बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी विसावे विस्तार अधिकारी पं स. देवळा, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख केवळ वाघ, हे कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ अश्विनी शेवाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रौदल, सौ सुर्यवंशी, सौ.अश्विनी जाधव, सौ. नीलिमा गांगुर्डे , सौ.मेतकर, सौ जयश्री देवरे, शालन देवरे, सौ अश्विनी शेवाळे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.



-----------------------------------------------------


Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

बातमी व जाहिराती साठी संपर्क :