लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - देवळा तालुक्यातील विठेवाडी, लोहोणेर, सावकी, खांमखेडा, भऊर परिसरात गेल्या दोन दिवसां पूर्वी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे या परिसरातील उस, मका, बाजरी, कोबी , फ्लॉवर, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभाग, व महसूल विभागा मार्फत तात्काळ नुकसानीची पहाणी करून जागेवर पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी व ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा योजने अंतर्गत हप्ता भरला असेल त्यांना त्वरीत पिक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा.अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समनव्यक कुबेर जाधव यांनी कृषी विभागाकडे केली आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सतत धार पावसामुळे विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब आनंदा निकम याचा दोन एकर सुरू उस अतिवृष्टीमुळे भुईसपाट झाला आहे. यामुळे निकम यांना मोठा आर्थिक फटका बसला असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.
-----------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig