नाशिक (प्रतिनिधी ) : - जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकराणात चालकासह पकडले आहे. यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना निलंबित करण्यात आल्या नतंंर झनकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून याच ठिकाणी काम केले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांच्या कामाबद्दल अनेक तक्रारी होत्या. मंगळवारी त्यांच्या चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असता त्याने लाचेबाबत झनकर यांचे नाव सांगितले त्यानंतर त्याला घेऊन पथक थेट झनकर यांच्या कार्यालयात दाखल झाले. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील पथकाने ही कारवाई केल्याने झनकर यांच्या कारभाराचा आणखी एक पैलू समोर आला आहे. पथकाने संपूर्ण कारभाराची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी शिक्षण संस्था चालकांकडून होत आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे ची बदनामी झाल्याची भावना कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig