सटाणा - देवळा रस्त्यावर पार्वतानंद लॉन्स जवळ दोन मोटरसायकल /दुचाकी यात अपघात

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - सटाणा - देवळा रस्त्यावर लोहोणेर गावा नजीक पार्वतानंद लॉन्स जवळ दोन मोटरसायकल /दुचाकी यात अपघात झाला. यात मागुन येणाऱ्या दुचाकी चालकाने पुढे चालणाऱ्या दुचाकी चालकाला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या इसमाचा मुलगा कृष्णा पवार राहणार आराई याने देवळा पोलीस स्टेशन ला फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटल्या प्रमाणे त्याचे वडील हे स्वतः च्या दुचाकीवरून क्र. एम. एच. ४१ एक्स२६४३ ने रस्त्यावर पुढे चालत असताना मागुन येणाऱ्या दुचाकी क्र. एम. एच. ४१ऐ आर ०५३९ च्या चालकाने धडक देऊन तेथुन पळ काढला. सदर अपघातात फिर्यादीचे वडील बाळु सखाराम पवार वय ४२ राहणार आराई यांना गभींर दुखापत झाली असुन त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
     सदर अपघाताचा गुन्हा देवळा पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवा. प्रकाश सोनवणे करीत आहेत.





बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :