लोहोणेर (प्रतिनिधी ) : - सटाणा-देवळा मार्गा दरम्यान सावकीफाटा -आराई रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असुन येथील शेतकरी वर्गाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा काटेरी झुडपे पावसाच्या पाण्याने वाढत चालेली आहेत. रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे व काटेरी झुडपांचे अतिक्रमण होताना दिसत आहे. झाडांच्या फादयांचा आकार वाढत चालल्याने व खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे चालकाला अंदाज येत नाही. यामुळे सतत लहान-मोठे अपघात घडत असतात. सदर रस्त्यालगत शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे काम संबंधित ठेकेदाराने सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी घेतले असुन रस्त्याच्या बाजूला सुरवातीला निकृष्ट दर्जाची खडी टाकली परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचे रस्तादुरस्ती चे काम चालू केलेले नाही.खडींचे ढीग पसरत चालल्याने अजुन अपघातात भर पडली आहे.पाहणी नुसार सदर खडी निकृष्ट दर्जाची व माती मिश्रित असल्याचे येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.पसरत चालेली खडी, खड्डे, काटेरी झुडपांचे अतिक्रमण यामुळे रस्त्याची परिस्थिती बिकट झालेली आहे.त्यामुळे प्रशासन व संबंधित यंत्रणेने त्वरित रस्त्याचे काम चालू करावे अशी मागणी स्थानिक शेतकरी व वाहनधारक यांचे कडुण होत आहे.
अनेक शेतकऱ्यांचे,चालकांचे दैनंदिन दळणवळण या रस्त्यावर अवलंबून आहे.हा रस्ता पूढे जाऊन साक्री-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो .या रस्त्याने शेतकऱ्यांना कांदा व शेतीमाल विकण्यासाठी ट्रॅक्टर व वाहन धारकांचा मोठा वापर असुन सटाणा-देवळा येथे जाण्यासाठी नेहमीच ट्रॅक्टर, टेम्पो द्वारे याच रस्त्याने वाहतूक केली जाते.या रस्त्याच्यालगत पसरलेल्या खड्या, काटेरी झुडपे वाढत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारी जाणारी वाहने दिसत नाहीत.तसेच साईड देयाची झाल्यास जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. परिणामी वाहनधारकांना अपघाताचा धोकाही वाढला आहे. तरी संबंधित यंत्रणा व प्रशासनाने ठेकेदारांनी याची तात्काळ दखल घेऊन प्रलंबित रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.तसे न झाल्यास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक शेतकरी, वाहनचालक,नागरीक यांनी दिलेला आहे. यावेळी परिसरातील शेतकरी हिरामण आहीरे, गणेश देवरे,बाळासाहेब रकिबे, धनंजय अहिरे, समाधान राजपूत, किशोर देवरे, नितीन अहिरे ,समाधान अहिरे ,आत्माराम पगार, नितीन देशमुख ,रामलाल पगार, वसंत अहिरे, बापू अहिरे आदी उपस्थित होते.
🔸शेतकरी व नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या :
-----------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig