ठाकरे सरकारकडून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान: भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचें टीकास्त्र

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - विजबील थकबाकी वसुलीसाठी आता महा वसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून.गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या बीज ग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकबाकी कडे दुर्लक्ष करून गरीब कुटुंबाची वीज कापणाऱ्या ठाकरे सरकारने आपला जनता विरोधी चेहरा पुन्हा उघडला आहे. अशी जोरदार टीका भाजपाचे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी केली आहे. ठाकरे सरकारच्या जनविरोधी कारभाराचा त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून जोरदार समाचार घेतला. राज्यातील सरकारी कार्यालय, ग्रामपंचायती पाणी पुरवठा योजना, मंत्र्यांचे बंगले, साखर कारखाने, खाजगी फार्म हाऊस, आदी वीज बिलांच्या थकबाकी ने उच्चांक गाठला आहे. मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. धनिक थकबाकीदारांत साठी अभय योजना राबिवनाऱ्या आघाडी सरकारने गरीब शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप आहेर यांनी केला. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोणाकाळातील टाळेबंदी मुळे सामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनना पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांची विज तोडायची हा महा वसुली सरकारचा दुटप्पीपणा जनतेने ओळखला असून तो थांबला नाही तर जनतेच्या रोषास जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा आहेर यांनी दिला आहे.

सामान्य जनतेचा विश्वास घात.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारल्यानंतर कृषी पंप आणि घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणीची कारवाई थांबवण्याचे आश्वासन देण्यात आले. पण अधिवेशना नंतर पुन्हा वीज तोडीणीची कारवाई सुरू करूण सामान्य जनतेचा विश्वास घात केला. फडवणीस सरकारच्या काळात वीजग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन थकबाकी वसुली थांबवली व आर्थिक साहाय्य देखील केले तरीही संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत वीज बिल भरू नका असा सल्ला देत शरद पवारांसारख्या नेते त्या काळात जनतेला भडकावत होते .आता त्यांच्याच आशीर्वादाने ठाकरे सरकारने वसुलीसाठी कारवाई करून लाखो कुटुंबांना वेठिस धरले आहे अशी टीका केदा आहेर यांनी केली आहे.

-----------------------------------------------------



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :