नेहाचे प्राथमिक शिक्षण जि. प.शाळा कळवण मुली 1 येथे झाले असून माध्यमिक शिक्षण जानकाई विद्यालय कळवण येथे घेत आहे.भारत सरकारच्या महत्वाकांक्षी सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक जिल्ह्यातून एक नवोदय विद्यालयाची स्थापना झाली आहे. इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी हजारो विद्यार्थी ही परीक्षा देतात.इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत या विद्यालयात शिक्षण दिले जात असून इयत्ता 9 वी नंतर काही विद्यार्थ्यांना परराज्यातील विद्यालयात पाठवले जाते.कोरोना काळातही अभ्यासात सातत्य ठेऊन चिकाटीने ह्या परीक्षेत शहरी भागातून अत्यंत कमी जागांसाठी तिची निवड झाली असल्याने सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.तिच्या यशासाठी तिचे प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक,शिवले क्लासेस कळवण,नवोदय क्लासआहेर मॅडम देवळा,माय व्हिजन नवोदय ऍडमिशन परगे सर,सुतार सर,शिंदे सर आणि आई वडिल यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
-----------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig