सटाणा (प्रतिनिधी) : सटाणा तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायती मध्ये चौदाव्या वित्त आयोग व ग्रामनिधीतुन भ्रष्टाचाराच्या चौकशी चे आदेश देऊन तीन सदस्यीय समिती नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर निधीत चौदाव्या वित्त आयोगातील निधी तसेच इतर सर्व प्रकारच्या ग्राम निधीत मोठी तफावत असुन यासाठी बागलाण तालुका शिवसेना प्रमुख सुभाष नंदन यांनी वेळोवेळी लेखी तक्रार व उपोषण करुन या प्रकरणी आवाज उठवला होता. मात्र कुठल्याही प्रकारे कारवाई होते नसल्याने अखेर ग्रामपंचायतीचे सदस्य यशवंत पवार, नीलेश कांकरिया, नितीन पवार, तुकाराम आहीरे, कल्पना जाधव, शोभा कांकरिया, प्रमिला चंदन, भाग्यश्री साळवे या आठ सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा सर्व प्रकार उघडकीस आणुन दिला. यांनतर मुख्याधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेऊन तीन सदस्यीय समिती नेमून चौकशी चे आदेश देण्यात आले.
तीन सदस्यीय समितीत सह्याक गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी, विस्ताराधिकारी अरुण सुर्यवंशी, आर.एम.पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी निःपक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig