देवळा : - तालुक्यातील सरस्वती वाडी येथील रस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. रस्ता खराब असल्याने शेतकरी बांधवांना आपला शेतमाल बाजारात विक्री साठी नेतांना त्रास होत होता जिल्हा परिषद सदस्या सौ नूतन आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून जि.प.च्या जिल्हा वार्षिक बिगर आदिवासी योजनेतून सदर रस्त्यांचे काम मंजूर झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पुंडलिक नगर येथील रस्त्याचे देखील काम करण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी सौ आहेर यांच्याकडे केली असता नूतन आहेर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (आबा ) आहेर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याची पाहणी केली असता सदर रस्त्याचे काम करणे अत्यावश्यक असल्याचे लक्षात आल्याने तातडीने अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित नागरिकांना सौ. आहेर यांनी दिले. यावेळी विलास भामरे, श्रीराम आहेर, पिंटू भालेराव, गंगाधर आहेर, संजय निकम, कारभारी शेळके, हिरामण आहेर, साहेबराव आहेर, सजन आहेर, वामन आहेर, दिलीप शेळके, अरुण आहेर, संदीप आहेर, प्रशांत निकम, माणिक आहेर, पोपट आहेर, भाऊसाहेब आहेर, किरण आहेर, मोहन निकम, प्रशांत आहेर, शांताराम आहेर, का आहेर, विजय आहेर, योगेश आहेर, अनिल आहेर, भैय्या आहेर, राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig