ठेंगोडा विद्यालयात लोकनेते लालजी पाटील यांची जयंती साजरी

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील माध्यमिक विद्यालय येथे विद्याप्रसारक समिती निंबोळे या संस्थेचे संस्थापक स्व.लालजी दौलत पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली . या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक कापडणीस व्ही.एम. कापडणीस यांनी स्वर्गीय लालजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तद्नंतर कापडणीस यांनी आपल्या मनोगतातून लालजी पाटील यांचे कार्य कायम स्मरणात राहील असे सांगितले.लालजी पाटील यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर कार्यात मोठे योगदान आहे. श्रीमती अर्चना खैरनार यांनी सूत्रसंचालन केले तर श्री. निकम यांनी आभार मानले.यावेळी विद्यालयाचे शिक्षक एस. बी.निकम, खैरनार ए. व्ही. खैरनार, पी. टी. वाघ, कापडणीस पी के कापडणीस, एस. ए. पगार, ए. पी.सोनवणे, पी. बी. शेवाळे, बी. एन. भामरे, एस. एच. पवार आदी उपस्थित होते.





बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :