देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे ग्रामपंचायत प्रांगणात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सरपंच पुनम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जनता विद्यालयाच्या विद्यार्थीनी राष्ट्रगीत सादर करत मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोहोणेर ग्रामपंचायत व कोरोना नियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने लोहोणेर परिसरात गत वर्षी कोरोना महामारीत काही घटकांनी यात जिवाची पर्वा न करता निस्वार्थ पणे सेवा केली त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिसरातील सर्व डॉक्टर्स व मेडिकल व्यावसायिक ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा वर्कर्स यांचा सत्कार ट्राफी व सन्मानपत्र पुष्पगुच्छ देउन तर आशा वर्कर्स यांचा सत्कार साडी व ट्राफी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच जनता विद्यालयातील १० वी प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानपत्र व ट्राफी देउन करण्यात आला. सुभाष परदेशी व त्यांच्या टिमने ग्रामपंचायतीस भारतमातेची प्रतिमा भेट दिली.
या कार्यक्रमास पंचायतसमिती सदस्या कल्पनाताई देशमुख, सरपंच पुनम पवार, उपसरपंच रेश्माताई आहीरे ,युवा नेते प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, दीपक बच्छाव, दिगंबर कोठावदे, योगेश आबा पवार ग्रामपंचायत सदस्य रतिलाल परदेशी, धोंडु आहीरे, चंद्रकांत शेवाळे,सविता शेवाळे, शीलाबाई उशीरे, प्रतिभा सोनवणे,गणेश शेवाळे, निंबा धामणे, सौ.विजया मेतकर,रामदास उशिरे,दिलीप भालेराव, अनिल आहेर, अशोक शेवाळे,दीपक देशमुख, गणेश शेवाळे, नाना जगताप, दिगबंर कोठावदे,गोविंद बागुल,रमेश अहिरे, प्रभाकर झाल्टे, अशोक परदेशी, अशोक गुळेचा, भैय्यासाहेब देशमुख,अविनाश महाजन,संजय सोनवणे, सोपान सोनवणे, पंडित शेवाळे, तलाठी अबांदास पुरकर, मंडळ अधिकारी राम परदेशी, ग्रामविकास अधिकारी यु.बी.खैरनार मुख्याध्यापक बैरागी,आजी-माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, जनता विद्यालयातील शिक्षक वृंद विद्यार्थी, कोरोना नियंत्रण समितीचे सर्व सदस्य आदी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार पंडित पाठक यांनी केले. आयोजक योगेश
(आबा) पवार यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व कोरोना नियंत्रण समिती यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीते साठी मेहनत घेतली. दरम्यान यावेळी कसमादे मराठी न्यूज चे संपादक जेष्ठ पत्रकार पंडित पाठक यांचा करोना कमिटीच्या उपस्थित कोरोना योद्धा म्हणून लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig