लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - देवळा तालुक्यातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांची नाशिक येथे लाचलुचपत विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. सुहास देशमुख हे गेली तीन वर्षापासून कामकाज बघत असुन त्यांच्या कार्यकाळ सर्वसामान्यना न्याय देणारा होता. परिसरातील अवैध धंदे व गुंडशाही मोडुन काढण्याचे काम त्यांनी केले. न्यायप्रिय, शांत स्वभाव व एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. कोणत्याही गुन्हयाची सखोल तपासणी करून आरोपींवर कारवाई करुन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी देशमुख यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. सामाजिक स्तरावर शांतता राखणे, गुन्ह्याची उकल होण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून जोखमीचे काम अतिशय तळमळीने व प्रामाणिकपणे करताना दिसुन येतात. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी देवळा येथे आपली यशस्वी कारकीर्द गाजवली तालुक्यातील सण,उत्सव यशस्वीरीत्या हाताळीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. देवळा शहर व ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीस आवर घालण्यासाठी आपला वचक कायम ठेवला. त्यांची प्रशासकीय बदली झाली असून लाललुचत प्रतिबंधक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
देवळा तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांची मालेगाव येथे, तर कार्य तत्पर आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांची दिंडोरी येथे बदली झाली असून आता पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांची बदली झाल्याने देवळा तालुक्यातील तीन प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig