विठेवाडी स्वस्त धान्य दुकानात डिजिटल पी.ओ. पी. थम्प सेवा सेवा सुरू : सुरळीत व संपूर्ण माहिती मिळत असल्याने नगरिकांमध्ये समाधानीचे वातावरण
0Pandit PathakAugust 16, 2021
लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील शासन मान्य स्वस्त धान्य दुकानात अत्याधुनिक डिजिटल पी.ओ. पी. थम्प सेवा सेवा सुरू झाल्याने लाभार्थी ना सुरळीत व संपूर्ण माहिती पूर्ण सेवा मिळत असल्याने लाभार्थी मध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे. विठेवाडी येथील श्री जय जनार्दन स्वामी महिला बचत गटाच्या माध्यमातून येथील ( दुकान नंबर ६४ ) अध्यक्ष सौ. संगीता रवींद्र कापडणीस हया सदरचे शासन मान्य स्वस्त धान्य दुकान चालवीत आहेत.मुळात गावांतील रेशन दुकान म्हणजे वेळेवर रेशन न मिळणे, अपुऱ्या कोठ्याचे वाटप करणे, आलेल्या धान्याची परस्पर विलेवाट लावणे, काळ्या बाजारात धान्यांची विक्री करणे, आदी बाबी सतत आढळत असतात. कोरोना महामारी मुळे केंद्र सरकारने आम जनतेला मोफत धान्य वाटप सुरू केली आहे. याचा जनतेला कितपत फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे. मात्र विठेवाडी येथील रेशन दुकान याला अपवाद आहेत. महिन्यातुन एक वेळा मोफत तर एक वेळेस रोख असे एकूण दोन वेळा नियमितपणे व सुरळीत धान्य वाटप करण्यात येत असते. लाभार्थी कार्ड धारक याचा नियमितपणे फायदा घेत असतात.
येथील रेशन दुकानात नव्याने पी.ओ.पी.डिजिटल सेवा सुरू करण्यात आली असून या नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली द्वारे लाभार्थी ग्राहकाने आपले बोटांचे ठसे (थम्प ) दिल्या नंतर सदरचे मशीन हे ग्राहक नंबर सांगत असते. त्याच बरोबर सदर लाभार्थी ग्राहकाला किती धान्य मिळणार आहे. त्याला मिळणाऱ्या धान्याचे किती रुपये मिळणार आहेत. यांचा संपूर्ण हिशोब अत्याधुनिक प्रणाली द्वारे सांगते व त्याच बरोबर डिजिटल हिशोब किती झाला याची पावती (रिसीट ) सुद्धा देते.यामुळे अडाणी व अशिक्षित लाभार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीमुळे होणारा काळा बाजार रोखण्यासाठी निश्चितपणे हातभार लागणार आहे. यामुळे ग्राहकांची होणारी लुबाडणूकही थांबणार आहे.रेशन दुकानांत सदरची अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली डिजिटल इंडिया सेवा सुरू झाल्याने लाभार्थी ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे. सदरची डिजिटल प्रणाली तालुक्यातील इतर सर्व दुकानांत सदर सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.