नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका युवकांनी ताकदीने लढवाव्या-राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष मा.महेबुबभाई शेख


देवळा- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख हे नासिक जिल्हा दौऱ्यावर असून दि.१६ ऑगस्ट रोजी देवळा येथील मर्चंट बँक हॉल येथे आयोजित "कार्यकर्ता संवाद मेळाव्यात"प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मेहबूबभाई शेख म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशातील एकमेव असा पक्ष आहे की, राज्यात सत्तेत आल्यानंतर कार्यकर्त्यांचे विकास कामासंदर्भातील प्रश्न मंत्रालयातून नव्हे तर पक्ष कार्यालयातून सोडवतात मा. शरद पवार साहेबांच्या सूचना आहे की पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काम मंत्रालयातून नव्हे तर राष्ट्रवादी भवन मधून झाले पाहिजे. प्रदेश अध्यक्ष ना.जयंतरावजी पाटील यांनी राष्ट्रवादी युवक कांग्रेस ला सोबत घेऊन "परिवार संवाद" यात्रेचे आयोजन केले असून देशात प्रथमच सत्ता आल्यानंतर देखील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यात्रेचे आयोजन करणारा आपला पक्ष असल्याचे ते म्हणाले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित अभिप्राय नोंदणी अभियानात देवळा तालुक्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला होता त्याचेही यावेळी त्यांनी कौतुक केले व येणाऱ्या नगर पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत युवक कार्यकर्त्यांनी ताकतीने उभे राहून लढवाव्या असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, प्रांतिक सदस्य योगेशआबा आहेर, जि.प. सदस्या सौ नूतनताई आहेर,जि.प. सदस्य यशवंतराव शिरसाट, पं. स.सभापती शांताबाई पवार, माजी समाज कल्याण सभापती उषाताई बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, प्रदेश सरचिटणीस चेतन कासव, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पवार, जिल्हा संघटक महेश शेळके, जिल्हा उपाध्यक्ष किरण भुसारे, बागलान निरीक्षक जयेश अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार, देवळा शहर अध्यक्ष दिलीप आहेर, युवक अध्यक्ष गोटू शिंदे, सचिन सूर्यवंशी, बाळासाहेब मगर, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सनी आहेर, तालुका उपाध्यक्ष स्वप्नील पाटील, दीपक देशमुख, पप्पू बोरसे, राहुल पवार, राजेश आहेर,सरपंच बळीराम वाघ, उपसरपंच रिंकू जाधव, मनोज गुजरे, मनोज देशमुख, विजय चव्हाण, गणू वाघ, बंडू चव्हाण, विजय हिरे, भैय्या बच्छाव, गोरख गोसावी, विलास पवार, मुन्ना जाधव, प्रवीण निकम, संदीप पवार, समाधान सोनवणे, सचिन देवरे, राहुल देवरे, रईस पटेल, संदीप गांगुर्डे, शुभम आहेर, समाधान देवरे, मुन्ना पवार, गोरख अहिरे, जयदीप शिंदे आदी उपस्थित होते प्रास्ताविक युवक तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर यांनी तर सूत्रसंचालन किशोर खरोटे यांनी केले.

       

लोहोणेर येथे मा.महेबुबभाई शेख यांचे स्वागत प्रसंगी योगेश पवार,उपाध्यक्ष दिपक देशमुख,जाकीर शेख आदी पदाधिकारी व ग्रामस्थ..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :