लोहोणेर : जनता विद्यालय,अभिनव बालविकास मंदिर आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मविप्र समाज दिन ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने साजरा...


लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय, अभिनव बालविकास मंदिर आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मविप्र समाज संस्थेचा समाज दिन ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवुन वंचित घटकांना प्रवाहात आणणाऱ्या आणि *बहुजन हिताय,बहुजन सुखाय* हे ब्रीद अंगिकारणारे संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म दिवस १९ ऑगस्ट हा दर वर्षी समाज दिन म्हणून संस्थेच्या सर्व शाखांमधुन साजरा केला जातो. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख, पंडित निकम, रतीलाल परदेशी, अविनाश महाजन, डॉ.सुभाष आहेर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ. रविंद्र शेवाळे, सदस्य पोपट उशीरे, अशोक आहिरे आदींसह मुख्याध्यापक वाय.यु.बैरागी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश थोरात यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात भैय्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजपूजन व ध्वजारोहण करून करण्यात आले. यावेळी गीत मंचाने समाजगीताचे गायन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले. १९१४ साली लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी कर्मवीरांनी केलेल्या कार्याची महती राकेश थोरात यांनी आपल्या प्रस्ताविकातून सांगितली. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे थेट लाईव्ह प्रेक्षपण गुगल मीट च्या साहाय्याने विद्यार्थ्यांना विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक एस. बी. एखंडे व जी.पी.गावित यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, आणि पालक ऑनलाईन पद्धतीने मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राकेश थोरात यांनी केले.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :