सेवानिवृत्तीनंतर मिळेल 19 हजार रुपये पेन्शन : फक्त 100 रुपये करा दररोज बचत


प्रत्येक जण 
आपले भविष्य सुरक्षित करण्यातसाठी व्यस्थ असतो. अशातच आपल्याला सेवानिवृत्तीनंतर पैशाची अडचण उद्भवू नये म्हणून सुरुवातीपासूनच पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करीत असतो. तुम्हाला सुद्धा  तुमचे भविष्य सुरक्षित व उज्जवल करायचे असल्यास नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) हि एक उत्तम सरकारी योजना उपलब्ध आहे. सदर योजनेतून तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळेल. या योजनेमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी  60% टक्के रक्कम एकरकमी म्हणून घेऊ शकता. या मध्ये जर तुम्ही दररोज 100 रुपये बचत केले तर तुम्ही 19 हजारांपर्यंत पेन्शन घेऊ शकता. एनपीएस ही एक मार्केट लिंक्ड सेवानिवृत्ती देणारी योजना आहे. यामध्ये पैशाची दोन ठिकाणी गुंतवणूक केली जाते, प्रथम इक्विटी म्हणजेच शेअर बाजार आणि दुसरे म्हणजे सरकारी बाँड किंवा कॉर्पोरेट बाँड. एनपीएसची किती रक्कम इक्विटीमध्ये जाईल हे तुम्ही खाते उघडल्यानंतरच ठरवू शकता. 

मासिक पेन्शन कशी मिळणार ?

एनपीएस ट्रस्ट कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या व्यक्तीने 25 व्या वर्षी दररोज 100 रुपये म्हणजे 3000 रुपये दरमहा जमा केले तर 35 वर्षांत तो 12 लाख 60 हजार रुपये जमा करेल. जर यावर प्रतिवर्षी 10 टक्के व्याज लागले तर मॅच्यरिटीच्या वेळी ही रक्कम सुमारे 1 कोटी 15 लाख असेल. जर तुम्ही पेन्शनसाठी एकूण रकमेपैकी 40 टक्के रक्कम ठेवली तर निवृत्तीवेतनाचा निधी सुमारे 46 लाख रुपये असेल. त्याच वेळी, आपण जमलेल्यांपैकी 60 टक्के रक्कम घेऊ शकता. हे सुमारे 69 लाख रुपये असेल. जर तुम्हाला पेन्शन फंडावर वार्षिक 5% परतावा मिळाला तर तुम्हाला दरमहा पेन्शन म्हणून 19,200 रुपये मिळेल.

एनपीएसचे फायदे 

आयकर कलम 80 सी अंतर्गत एनपीएसमध्ये 1.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक सूटचा लाभ मिळतो. याशिवाय 80CCD(1B) अंतर्गत 50 हजारांचा अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक किमान 1000 रुपये जमा करावे लागतील. एनपीएस योजनेच्या गेल्या 10 वर्षातील सरासरी परतावा 9.65 टक्क्यांच्या जवळपास आहे.

योजनेसाठी कोणाशी संपर्क साधणार ?

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) हि एक उत्तम सरकारी योजना असून आपल्या परिसरातील, तालुका व जिल्हा पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा लागणार.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :