न्या. रमणा : भारताचे ४८ वे सरन्यायाधीश

 


कोण आहेत एन व्ही रमणा?

👉सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांचं पूर्ण नाव नथापलपती वेंकट रमणा असं आहे. त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील पोन्नवरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला.
👉१० फेब्रुवारी १९८३ रोजी त्यांनी वकील म्हणून या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यांनी याआधी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनदेखील काम पाहिलं. तसंच आंध्र प्रदेशच्या न्याय अकादमी अध्यक्षाच्या रुपातही काम केलं
👉 न्यायमूर्ती रमणा १० मार्च २०१३ पासून २० मे २०१३ पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश म्हणून २०१३ साली नियुक्ती झाली.
👉जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सुविधा पुरविण्याचा त्यांचा निर्णय गेल्या काही वर्षांतील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चित निर्णयांपैकी राहिला.
👉२६ ऑगस्ट २०२२ रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत.



हायलाइट्स
२४ मार्च रोजी न्या. शरद बोबडे यांनी न्या. रमणा यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली होती. मात्र सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती व्यंकट रमणा यांच्या नावाला राष्ट्रपतींनी अगोदरच मंजुरी दिली होती. सरन्यायाधीश पदावर पोहचणारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायालयाचे एन व्ही रमणा हे पहिले न्यायमूर्ती ठरलेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. एन व्ही रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :