प्रेमाची चाहूल लागताच प्रेमी युगलाचा आत्महत्येचा प्रयत्न! तत्काळ उपचार मिळाल्याने प्राण

प्रेमासबंधी गावातील लोकांना माहिती झाली असून अल्पवयीन असल्याने दोघांचा विवाह होणार नाही.या नैराश्यतेतुन व्हाट्सअप स्टेट्स ठेवत अल्पवयीन प्रेमीयुगालाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दि.14 रोजी देवळा शहरातील हॉटेल वेलकम येथे घडली.सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने दोघांचे प्राण वाचले आहेत.देवळा पोलिस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार एका खाजगी क्लास मध्ये संगणक प्रशिक्षण घेत असतांनाच दोघांच्या मैत्री चे रुपांतर प्रेमात झाले.प्रेमसबंध सुरू असताना दोघाविषयी गावातील लोकांना माहिती पडले असुन ते आपल्या वर नजर ठेवून आहेत.आपण अल्पवयीन असल्याने आपला विवाह होणार नाही.असा समज करून घेत.दोघांनी आत्महत्यतेचा निर्णय घेतला.आणि देवळा येथील वेलकम हॉटेल मधे गुरुवारी दि.14 रोजी अकरा वाजेच्या सुमारास व्हाट्सअप स्टेट्स ठेवत प्रेमीयुगालांनी तणनाशक हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र मित्रांनी व्हाट्सअप स्टेट्स बघितल्याने त्यांनी  हॉटेलं कडे धाव घेत लगेच देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने दोघांचे प्राण वाचले असुन प्रकृती स्थिर आहे.या घटनेमुळे देवळा शहरात एकच खळबळ उडाली असून प्रेमीयुगलासह हॉटेलं व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यवस्थापकाने प्रेमी युगुलाला खोली देताना त्यांच्या सामानाची किंवा त्यांच्याकडे आधार कार्ड अथवा इतर कोणतेही ओळखपत्र तसेच कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी केली नाही तसेच त्याच्याकडे हॉटेलचे रजिस्टर पाहणीसाठी मागितले असता त्यांना ते पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले नाही हॉटेलच्या कोणत्याही रजिस्टरमध्ये त्याबाबत नोंदणी नसल्याचे आढळून आल्याने व्यवस्थापक दीपक अहिरे यांनी शासकीय आदेशाचे उल्लंघन करून प्रेमी युगुलाला बेकायदेशीर रित्या त्यांच्या हॉटेलमध्ये काही काळ वास्तव्यासाठी ठेवले होते त्यामुळे सदरचे कृत्य हे बेकायदेशीर असून शासकीय आदेशाचे उल्लंघन करत त्यांच्या अपराधास साहाय्य केले म्हणून याप्रकरणी पोलीस नाईक रामदास गवळी यांनी देवळा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून  व्यवस्थापक अहिरे रा.चिराई ता.बागलाण आणि आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून प्रेमीयुगालावर  वर कलम ३०९, ११४,११८  अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी आदी पोलिस कर्मचारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :