देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे(दि.१५आक्टो)रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी लोहोणेर परिसरातील आदिवासी बहुल गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नोटबुक,पेन आदी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद व महात्मा फुले प्रतिष्ठाण यांनी केले होते.सुमारे साठ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.कोरोना काळात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याने अडथळा निर्माण झाला होता.परिसरातील जिल्हा परिषद शाळेत आदिवासी तथा आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबातील मुले मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेता आहेत. या बहुतेक सर्व विद्यार्थ्यांकडे पुरेसे लेखन साहित्य नसल्याने त्याचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.ही समस्या सोडविण्यासाठी वाढदिवासाचे औचित्य साधून सदर विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले.यावेळी समता परिषदेचे रमेश आहिरे, कोळी महासंघाचे योगेश आबा पवार, राष्ट्रवादी यु. तालुका उपाध्यक्ष दिपक देशमुख, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस जाकीर शेख,लोहोणेर ग्रामपंचायतींचे सदस्य धोंडु अण्णा आहीरे,भाउसिंग गायकवाड, धनंजय शेवाळे, राष्ट्रवादी यु.लोहोणेर अध्यक्ष मनोज देशमुख, तालुका सोशल मीडियाचे ललित शेवाळे, गणेश देशमुख, बापु मिस्तरी, रघुनाथ वाघ, गोकुळ शेवाळे, प्रकाश देशमुख आदी राष्ट्रवादी व समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
समतेचे कैवारी आदरणीय भुजबळ साहेबांना उत्तम आरोग्य लाभो व जनतेची सेवा त्यांच्या कडून घडो ही परमेश्वर चरणी प्रार्थना व त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.आदिवासी व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेचे कडुन मदत करण्यात आली.- रमेश आहिरे. मा.तालुकाध्यक्ष समता परिषद देवळा.
---------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig
