सुदर्शन सोनवणे यांचा लोहोणेर कराच्या वतीने सत्कार

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे एक दिव्य उद्दिष्ट् होते.आई वडिलांचा आशीर्वाद पाठीशी होता. व मनाशी ध्येय गाठण्यासाठी खूणगाठ बाधल्याने सुमारे सोळा तास अभ्यास केला. सर्वांचे पाठबळावर मी या परीक्षेत उत्तीर्ण झालो असलो तरी आपल्या मातृभूमीला कधीच विसरणार नाही. मी जन्मभूमीला कधी विसरणार नाही. तिचे ऋण माझ्यावर नेहमी राहील असे उदगार लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लोहोणेर येथील युवक सुदर्शन सोनवणे याने आपल्या मूळगावी कुटूंबीया सह भेटी प्रसंगी काढले.लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर प्रथमच सुदर्शन सोनवणे याने आपल्या मूळ गावी लोहोणेर येथे आपल्या आई , वडील , भावा समवेत भेट दिली.यावेळी लोहोणेर कराच्या वतीने त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रथम सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतल्या नंतर सुदर्शन सोनवणे यांनी कुटूंबीयासह स्वकियाचा सत्कार स्वीकारला त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात लोहोणेर ग्रामस्थांचा सत्कार समारंभास हजेरी लावली .यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतिष देशमुख, रतीलाल परदेशी, योगेश पवार, रमेश आहिरे, धोंडू आहिरे, संजय सोनवणे, गणेश शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, दावल खैरनार, एकनाथ बागुल, प्रवीण आहिरे, केवळ सोनवणे, हिरामण आहिरे, आदींसह सुदर्शनचे वडील नानाजी सोनवणे, आई व आजोबा नथु सोनवणे व त्याचे दोन भाऊ यांचेसह लोहोणेर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंडित पाठक यांनी केले.

 आपण उच्च पदस्थ अधिकारी व्हावे ही आपली मनापासून इच्छा होती. त्यासाठी रात्रीचा दिवस करून मनापासून अभ्यास केला. पहिल्या प्रयत्ननात यश आले न आल्याने खचून न जाता वारंवार प्रयत्न केले. मात्र जिद्द सोडली नाही. शेवटी यशाला गवसणी घातली. त्यासाठी आई, वडील व भाऊ याची मोलाची साथ मिळाली. उच्च पदस्थ अधिकारी झालो असलो तरी कुठेही नियुक्ती झाली तरी मी माझ्या मातृभूमीला कधी विसरणार नाही.----सुदर्शन सोनवणे लोहोणेर

---------------------------------------------------

☑️कसमादे मराठी न्यूज 👇



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :