प्रा.दिपीका शिंपी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.....

मालेगाव प्रतिनिधी - मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील श्री बी एम पाटील महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती दिपीका शिंपी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर सोहळ्याचे आयोजन मालेगाव येथील महावीर इंटरनॅशनल व मसगा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून परिसरातील बारा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सौ.शिंपी अनेक वर्षांपासून दाभाडी महाविद्यालयात सेवेत आहेत. एन.एस.एस सारख्या उपक्रमात सहभागी व विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळत त्यांना योग्य दिशा दिली आहे.शिंपी ह्या उच्चशिक्षित व कायद्याच्या पदवीधर असुन त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदीरचे संचालक ए.एस.पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे,महावीर इंटरनॅशनल संस्थेचे अध्यक्ष अनिल नहार, उपाध्यक्ष पारस बाफणा,सचिव राजेंद्र बाफना व संगिता बाफणा ह्या होत्या. उपजिल्हाधिकारी शेवाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी शिक्षकांच्या प्रेरणेने च घडलो व या खडतर प्रवासात स्पर्धेच्या युगात शिक्षकांनीच मला उभे केले व योग्य दिशा दिली.याच बरोबर राजेंद्र बाफणा,डॉ.संगिता बाफना यांनी आपली मनोगत व्यक्त केली.प्रा.अतुल वाघ यांनी प्रास्ताविक केले.तर महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश शिरुडे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम झाला. यावेळी महाविद्यालयातील पदाधिकारी, प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सुत्र संचलन प्रा.सागर रौदंळ तर प्रा.राजेंद्र डोखे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक व माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

---------------------------------------------------

☑️कसमादे मराठी न्यूज 👇



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad