सावकी फाट्याजवळ अपघात:युवक जागीच ठार.

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - सटाणा- देवळा रस्त्यावर सावकी फाट्या जवळ अपघात झाला असून या अपघातात  सटाणा शहरातील युवक गणेश नाना खलासे याचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री  ८ .३० वाजेच्या  सुमारास सटाणा- देवळा रस्त्यावरील सावकी फाट्याजवळ सटाणा शहराकडून जाणाऱ्या पिकअप ने मोटर सायकल ला समोरा समोर धडक दिल्याने या  अपघातात सटाणा शहरातील 60 फुटी रस्ता बस स्थानकाच्या पाठीमागे राहणाऱ्या गणेश नाना खलासे (वय 20) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  मृतदेह  सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून या अपघातातील पिकअप चालक वाहन घेऊन फरार झाला आहे. अपघाताचा तपास पोलिस करीत असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गणेश खलासे यांच्या पश्चात आजी ,आई ,वडील, दोन भाऊ एक बहिण असा परिवार आहे .अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व मित्र परिवाराने सरकारी दवाखान्यात व पोलीस स्टेशनला गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :