काल सायंकाळ पासून लोहोणेर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली चोवीस तास उलटले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने लोहोणेर ग्रामपंचायतीचे सफाई कामगार कांतीलाल सोळंकी, व शांताबाई सोळंकी यांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने धान्य, कपडे, व संसार उपयोगी साहित्य भिजून गेले तर येथील आदिवासी वस्ती असलेल्या गढी वरील छोटू गोपीनाथ माळी व कैलास चिंधा जाधव, हिरामण विठ्ठल राठोड यांच्या घराच्या भिंत पडलं या सतत धार पावसामुळे पडल्याने नुकसान झाले आहे.
या नुकसानीची लोहोणेर ग्रामपंचायत सरपंच पूनम पवार यांनी पाहणी केली असून नुकसान ग्रस्तांनी भरपाईची मागणी केली आहे. याबाबत लोहोणेर येथील तलाठी अंबादास पुरकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.-----------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig