सटाणा ( प्रतिनिधी ) : - सटाणा येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांची मुंबई येथे ATS दहशतवादी विरोधी पथकात बदली झाली आहे. ते सटाणा पोलिस ठाण्यात गेली अडीच वर्षां पासुन आपली सेवा बजावत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी शहरवासीयांना विश्वासात घेऊन गट - तट न ठेवता कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अत्यंत प्रामाणिक सेवा केली. अडीच वर्षांत पोलीस कार्यालय, आवार व परिसरात दलालांची चलती बंद करून भ्रष्टाचारावर अंकुश ठेवला. गुन्हे दाखल करण्या पुर्वी भांडण तंटे बाहेरच मिटवून पोलीस ठाण्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला. पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये गायकवाड यांनी आत्मविश्वास निर्माण केला. कोरोना काळात गोरगरीब जनतेसह कर्मचारी, व्यापारी यांना जमेल ती मदत केली. आणि याचीच पावती म्हणून शहरवासीयांनी शहरातुन सजवलेल्या रथातुन गायकवाड यांची मिरवणूक काढण्यात आली व त्यांना निरोप देण्यात आला.
जीप मधून मिरवणूक काढण्यात आल्या नतंंर शहरातील महीलांनी औक्षण केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी चौका चौकात त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जनतेने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला. प्रथमच बागलाणच्या इतिहासत एका पोलीस निरीक्षकांची मिरवणूक काढुन निरोप देण्याची पहीलीच वेळ असावी. या मिरवणुकीत सटाणा पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक व नागरिक सहभागी झाले होते.
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig