अमृता बोरसे यांची राष्ट्रीय GB जम्प रोप स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून निवड...

सटाणा - कु.अमृता वसंत बोरसे ( क्रीडाशिक्षक , शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा दहिंदुले ता. सटाणा जि. नाशिक ) यांची राष्ट्रीय GB जम्प रोप स्पर्धेसाठी मार्गदर्शक पदी निवड करण्यात आली आहे .अशी माहिती महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनचे खजिनदार श्री. दिपक निकम यांनी दिली. दिनांक 18 ते 20 सप्टेंबर 2021 दरम्यान उदयपुर राजस्थान येथे संपन्न होणाऱ्या 17 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ सहभागी होणार असून या संघाच्या मार्गदर्शक पदी त्यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्राचा संघ 16 सप्टेंबर 2021 रोजी नाशिक येथून उदयपुर राजस्थान येथे रवाना होणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.‌ 
बोरसे यांना नुकताच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :