लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - लग्नाच्या बोहल्यावर चढून भावी आयुष्यातील सुखाची स्वप्ने पाहणे ही प्रत्येक स्त्री ची इच्छा असते. मात्र ही स्वप्ने रंगवत असतांना केवळ लग्नाच्या वेळी हातांवर काढलेली मेहंदी निघून एकवीस दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच देवा घरी निघून जाणे म्हणजे भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी नुकतीच लोहोणेर येथे घडली असून याच घटनेची आज दिवसभर लोहोणेर गावांत सर्वत्र चर्चा सुरू होती. बागलाण तालुक्यातील मोराणे (सांडस ) येथील मूळ रहिवाशी असलेले व सध्या लोहोणेर येथे वास्तव्यास असलेले येथील जावई यांचा मुलगा आदित्य शेवाळे जो सध्या लोहोणेर येथील इम्प्रेशन सायबर व मोरया ऑपटीक फ़ायबरचे संचालक याचा विवाह गेल्या महिन्यात २७ तारखेला बागलाण तालुक्यातील अंबासन येथील शेतकरी नितीन नारायण आहिरे यांची कन्या शीतल हिच्या बरोबर आंबसन येथे उत्साहात संपन्न झाला. मोठ्या आनंदाने दोघेही वधू - वर आपल्या कौटुंबिक सुखाची स्वप्ने पहात संसाराला प्रारंभ करीत असताना नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विवाहानंतर आपल्या सुखी संसारांची स्वप्ने रंगविण्यादंग असलेल्या नवविवाहित शितलची सहा दिवसा पूर्वी अचानक तब्बेत बिघडली म्हणून तिला सटाणा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे समजले. मात्र येथे तिच्या प्रकृतीत योग्य ती सुधारणा न झाल्याने तिला दोन दिवसांनी मालेगाव येथे हलविण्यात आले. मात्र तेथेही दोन दिवस उपचार घेतल्या नंतर नाशिक येथे व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथे शितलवर उपचार सुरू असतानाच आज पहाटे अचानक शीतल या सुखी संसारांची स्वप्ने अर्धवट सोडून इलोकीच्या प्रवासासाठी निघून गेली. आज सकाळी ११ वाजता अंत्यत शोकाकुळ वातावरणात शितलवर तीच्या सासरी मोराणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ही दुःखत घटना जितकी लोहोणेर कराच्या काळजाला तडा देऊन गेली तितकीच तिच्या माहेरी अंबासन येथे व सासरी मोराणे येथे देऊन गेली. विवाहास एकवीस दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच नवविवाहितेवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्देवी घटना घडावी.यासारखे दुःख अजून कोणते असू शकते. नियतीच्या मनात नक्की काय होते. हे सांगणे कठीण आहे. मात्र ही घटना लोहोणेर, मोराणे व अंबासन हया तिन्ही गावांना दुःख देऊन गेली हे तर नक्की! ह्या घटनेने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.